प्रपंच
प्रपंच
संसाराच्या जात्यावर
अहोरात्र जुंपवले
तन मन झिजवूनी
घरकुल फुलवले
विसरले सहज स्व
नित्य नवे शिकताना
हाती धुपाळ उरले
निज निखारे होताना
स्वप्न-धागे उसवले
जखमांना शिवताना
हसू ओठांशी विरले
वेदनांना सोसताना
मोती सुखाचे सांडले
वेचलेले झाकताना
ओघळत्या ऊरीं दाटे
ठाव मनीचा घेताना
संसाराची दोन चाकं
दमलीत धावताना
गेले आयुष्य सरुनी
विसाव्याला शोधताना
🔸🔹🔸💠🔸🔹🔸🌿
*स्वप्ना साधनकर*
(मुंबई)
