STORYMIRROR

Swapna Sadhankar

Romance

4  

Swapna Sadhankar

Romance

बहरुनी वसंतात...

बहरुनी वसंतात...

1 min
377


तू भेटण्यास आतुर व्हावे

असे शब्द मजला सुचावे

भावनांनी भुरळ घालावी

असेही कधी तरी घडावे


तुझ्या मनी इंद्रधनु उमटावे 

क्षितिजावर हिंदोळ्यात झुलावे

सप्तरंगी प्रीत छटा उधळावी

मी ही धुंद नभांगणी तरंगावे


मम ह्रदयी वसंत फुलताना

तव मोगऱ्या परी मोहरावे

अंतरंगी लावण्य खुलताना

पाकळी पाकळीतूनी दरवळावे


ऐक, कळले ना तुला सारे ?

मोरपिशी स्पर्शातूनी पुसावे

रोमरोमात उमलताना शहारे

निःशब्द होकारातूनी कळावे


अनुरागी रंगात रंगले पुरते

असे कधी तरी तर घडावे

प्रेमराग लालिमा पांघरूनी

आपण गुलाबी स्वप्न जगावे


🔸🔹🔸💠🔸🔹🔸🌿

      *स्वप्ना साधनकर*

             (मुंबई)



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance