STORYMIRROR

Swapna Sadhankar

Classics

4  

Swapna Sadhankar

Classics

काव्या

काव्या

1 min
295


कधी ग येशील सखे

पांघरून वस्त्र काळे

दिस महिने लोटले

तुझ्या वाटेवर डोळे


अनाहुत हुरहूर

भावनांचे गुंते जाळे 

उकलण्या आसुसले

तुझ्या वाटेवर डोळे


साथी सवाई न दुजा

मन कराया मोकळे

खुलवण्या हितगुज

तुझ्या वाटेवर डोळे


कोऱ्या कागदास टीपे

शब्दाक्षरांचे सोहळे

छंदबद्ध रूप घेण्या

तुझ्या वाटेवर डोळे


🔸🔹🔸💠🔸🔹🔸🌿

      *स्वप्ना साधनकर*

             (मुंबई)


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Classics