विवश
विवश
मी चालत राहिले
रस्ता वाढत राहिला
कधी कुणी सोबतीला
तर कधी एकटेच
लक्ष्य दूरवर दिसेनासे
वळणं देखील अंधुक.....
किती ऋतू आडवे
आले नि गेले सरत
कितीदा वसंत बहरला
तसाच तो ओसरला...
एकदा वादळ घेऊन आला
कुठलाही अडसर त्याला
अडवू शकला नाही
नकळत मला वाहवत नेले.....
येऊन अश्या जागी थांबले
जिथे गुंता उकलणे कठीणच
सारे अस्ताव्यस्त, विस्कळीत...
भानावर आले न आले की
समोर बोट दाखवणारं जग
मागे वळून बघणं अशक्य.....
ओल्या पापण्यांच्या भार सांभाळत
अन् स्वतःचाच हात घट्ट पकडून
थकलेल्या पायांवर स्तब्ध उभी
त्याच्या आठवांच्या खोल डोहात...
हतभागी!, जाणीव मात्र जिवंत
जवाबदारीची आणि कर्तव्याची
परत आपसूक चालत सुटले मी...
चुरगळल्या आयुष्याची घडी घालत
🔸🔹🔸💠🔸🔹🔸🌿
*स्वप्ना साधनकर*
(मुंबई)
