भाव-रंग
भाव-रंग
तुझे आकस्मिक येणे
मला उधळून रंग देणे
फुलवून भावनांची बाग
क्षणात उजाडून जाणे
विखुरला पालापाचोळा
अजूनही सावडत आहे
रंगीबेरंगी आठवणींचा
उगा दिलासा देत आहे
रंगता उडालेले शिंतोडे
पांघरून धुमसते काही
तुझ्या मिठीतुन सुटता
माझे राहून गेले काही
🔸🔹🔸💠🔸🔹🔸🌿
*स्वप्ना साधनकर*
(मुंबई)
