प्रीत-कस्तुरी
प्रीत-कस्तुरी
तुज बघता क्षणीच
मन उगाच हसले
कसे कुणास ठाऊक
वेडे प्रेमात पडले
तुझे वागता लाडिक
खुळे पूर्तेच रमले
हळू हळू नकळत
भेटी गाठीत फसले
माझे न बोलता काही
भाव सारे तू हेरले
हृदयाशी जोडू नातं
बोल अंतरी फुलले
ओढ लागता जीवास
सोबतीस आसुसले
नजरानजर होता
प्रीत-कस्तुरी भुलले
मनी उठता रोमांच
तार यौवनी छेडले
धुंद आसक्त तालात
सूर आपुले जुळले
🔸🔹🔸💠🔸🔹🔸🌿
*स्वप्ना साधनकर*
(मुंबई)

