Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

शुभांगी कोतवाल

Classics Others

4.8  

शुभांगी कोतवाल

Classics Others

निसर्गाची किमया

निसर्गाची किमया

1 min
1.2K



अचंभित करणारा , आश्चर्यचकित करणारा ,

असा हा निसर्ग म्हणजे आहे तरी काय ?

दैवी शक्ती की मायावी कृती ?

रंगीबेरंगी सुंदर फुलं पानं 

रातराणी , मोगरा , जाई- जुई 

शेवंती , गुलाब , चाफा , निशीगंध 

सुंदर सुवासित मनमोहक असणारी रंगसंगती 

त्यात ती नाजूक , छोटी सुवासित 

रात्री उमलणारी फुले 

सकाळपर्यंत जणू झाडाची साथ सोडून 

भुईवर विनम्रपणे लोटांगण घालणारी

प्राजक्ताची पांढरी - शेंदरी व बकुळफुले 

आंबट गोड फळे जणू दैवी उपहार 


रात्रीचा तो शीतल चंद्रप्रकाश 

लहान मोठे लुकलुकणारे तारे 

थंडीत सकाळी झाडांवर पडणारे दवबिंदू 

आणि त्यात सूर्योदयाची पडणारी कोवळी किरणं 

सगळं कसं मनाला प्रफुल्लित करणारं 

निखळ , स्वच्छ निरंतर वाहणारे झरे ,

नद्या , समुद्राच्या उठणाऱ्या लाटा 

उंचीवरून पडणारे ते कधी न 

थांबणारे प्रचंड व जमिनीवर पडून 

स्थिरावणारे धबधब्याचे शीतल पाणी 

डोंगर , दऱ्या आणि त्यावर पसरलेली 

हिरवळ आणि रंगीत फुलांची चादर 

कुठे पसरलेला शुभ्र बर्फाचा गालिचा

पशु पक्षी वृक्ष आणि घनदाट अरण्ये 

त्यावर ती रंगीबेरंगी फुलपाखरं 


पावसाळ्यात आकाशात लख्ख चमकणारी वीज 

मुसळधार पावसाने ओथंबून वाहणाऱ्या नद्या 

कुठे धरणीकंप तर कुठे उसळणारा लाव्हा 

घसरून पडणारी ओली जमीन ,

तर कुठे दुष्काळ व ओसाड जमीन 

मनाला विचलित करणारा निसर्गाचा प्रकोप

कधी समुद्राच्या लाटांचा प्रकोप 

तर कुठे सुसाट वाहणारा वादळवारा 

सर्वच कसं न उलगडणारं , न उमजणारं 

सर्व काही त्या ईश्वराच्याच हाती !!

निसर्गाची किमयाच निराळी !!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics