Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anju Metkar

Classics

4  

Anju Metkar

Classics

सखी

सखी

1 min
347


इवलेसे टाकत पाऊल

अन् मनात नवखी चाहूल

माझ्या मनीचे काहूर

अन् अंतरीची हुरहूर ।।१।।


पानावरील कोवळ्या दवात

अलगद भिजलीस रवारवात

पक्ष्यांच्या कलरवात

गुंतून लाजलीस तू गालात ।।२।।


कधी फिदा मोगरीच्या परिमलावर

तर कधी काट्यातल्या गुलाबावर

कधी मनभावन श्रावणातील हिरवाई वर

रुंजी घातलीस तू भ्रमरासम मनावर ।।३।।


कधी लुब्ध प्राचीच्या रंगछटांवर

कधी सोनसळी संध्याछायेवर

कधी लुब्ध देवघरातील तेवणार्या समईवर

तर कधी सोम नीशेच्या प्रणयावर ।।४।।


प्रत्येक वेळी उमललीस तू अनावर

मुलायम मनःपटलाच्या धरेवर

उमटलीस वेचक शब्दपात्यांवर

अलगद उतरलीस शाईने कागदावर ।।५।।


अगतिक केविलवाणेपणात

तुच उमटलीस अस्फुट हुंदक्यात

सुखदुःख समसमानात

तूच उतरतेस मन अंगणात ।।६।।


कधी ओढुन शेव पदराचा

कधी घेशी ठाव अंतरीचा

आणून नेत्री पूर अश्रूंचा

तर कधी लाजरा भाव गालीचा ।।७।।


तूच सखी तूच प्रिया

जाणतेस अंतरीच्या भावा

धरून हाती हात तुवा

फुलवेन कविते तव मारवा ।।८।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics