Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vaishnavi Kulkarni

Classics

4  

Vaishnavi Kulkarni

Classics

मज वाटे पक्षी व्हावे..!

मज वाटे पक्षी व्हावे..!

1 min
417


कधी वाटते घ्यावी भरारी मी होऊन पक्षी,

मखमली त्या हरित डहाळी घ्यावी वामकुक्षी ! 


उपभोगावा निसर्ग सारा ह्या अनिमिष नेत्रांनी,

सृष्टीचे गुणगान करावे स्फुरत्या मंत्रांनी ! 


चाखावी ती गोड फळे अन् करावे मधुपान ,

विहंग होऊन बागडताना हरपावे मम भान ! 


सरिता,सागर अन् पर्वतराजीवर व्हावे मी लुब्ध ,

अंगी त्यांच्या क्रीडा करिता व्हावे मंत्रमुग्ध ! 


नसावे ते बंधन कसले स्थळ व काळाचे,

गावे गोडवे प्राशन केल्या नितळ त्या जळाचे!


बांधावे मम घरटे सुंदर घनदाट तरुवरती,

जेथे केवळ मीच नव्हे तर बहुविध संचरती ! 


घरटे माझे बहरून यावे किलबिलत्या जीवांनी,

मना माझिया मिळावा हर्ष त्या चिमुकल्या रवांनी!


नसावी मज कसली चिंता नि नकोत कसले क्लेश,

वाटावा मी मोदच केवळ अन् तो ही उरावा शेष ! 


अखिल सृष्टीचे कवाड असावे मजसाठी उघडे,

झडावेत या सृष्टीमध्ये चैतन्याचे सनई- चौघडे ! 


सरता माझा हा मनुजजन्म, वाटे मागावे हे दान,

आयुष्याच्या खेळात मज व्हावा हा मुक्त खगजन्म प्रदान ! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics