STORYMIRROR

Vaishnavi Kulkarni

Others

3  

Vaishnavi Kulkarni

Others

अधिकमास

अधिकमास

1 min
156

यंदा आला श्रावण घेऊन अधिकमास , 

लेकीसोबत जावयाचाही आता मान होणार खास ! 

सासूबाईंची उडेल आता धांदल काय बाई देऊ वाण ? 

कपडे , चांदी , अपुप खरेदीला आता येईल उधाण ! 

पळी, निरांजन , ताम्हण घेऊ की देऊ जावईबापूंना चांदीचे ताट ? 

सासरेबुवा पाहू लागती मग लेक आणि पंतांच्या आगमनाची वाट ! 

लेक जावई येताच त्या माऊलीला वाटे ह्यांना कुठे ठेवू अन् कुठे नाही , 

पित्याच्या मनात लेक जावयाच्या सुखांची नौबत अखंड झडत राही ! 

नेहमीपेक्षा निराळाच आहे बुवा यंदा पुरुषांचा सासरी थाट , 

पंचपक्वान्न बनले मेजवानीसाठी तर बसायला देखील चांदीचाच पाट ! 

बत्तासे , अपूप , मिठाई ह्यांनी ओसंडून वाहणारी मिळे मग चांदीची थाळी , 

उत्तम वस्त्रलाभ होता जावई बापूंच्या मनात वाजे समाधानाची टाळी ! 


Rate this content
Log in