STORYMIRROR

Vaishnavi Kulkarni

Others

3  

Vaishnavi Kulkarni

Others

आई काय असते?

आई काय असते?

1 min
14

आई ,संसाराच्या वाळवंटातील एक शितल गाव , 

आई ,ठेच लागता ओठांवर सर्वप्रथम येणारं नाव ! 


सदैव असते वावरत घरातल्या प्रत्येक भागात ,

पराकोटीची सहनशीलता सामावलेली असते तिच्या अंगात !


कधी तुळशीसमोर लावते सायंदिवा ,तर कधी स्वयंपाकासाठी खपते , 

घरातल्या प्रत्येकाचीच आवड ती हृदयापासून जपते. 


पुरवते ती आपल्या बाळांचा प्रत्येक लहान - मोठा हट्ट , 

अन् विणत असते आयुष्यातल्या नात्यांची विण घट्ट ! 


आईच्या पश्चात संपते आपलं बालपण , 

संसारात जबाबदाऱ्या सांभाळताना जाणवते नकळत अवघडलेपण ! 


मृत्यूसम यातना सोसून बाळाला जग दाखवणारी प्रत्येक आई असते महान , 

जन्मभर तिच्या पदराखाली राहुनदेखील भागत नाही आईच्या प्रेमाची तहान ! 


Rate this content
Log in