पाऊस मनातला.
पाऊस मनातला.
उगाच टपोरे थेंब तुझे,अंगभर लेवू देवू नकोस..
हे पावसा असा तू उन्मत ,बेभान होऊ नकोस.
का असा उच्छृंखल कोसळून साजणाची स्मृती देतोस ?
विरहात तप्त माझ्या मनाला पुन्हा पुन्हा का तू पोळतोस ?
दूरदेशी साजण माझा ,त्याच्या परतीच्या वाटेत तू येऊ नकोस ,
हे पावसा असा तू उन्मत ,बेभान होऊ नकोस. ||१||
अधीर लोचन हे माझे आधीच अश्रूंनी भरलेले ,
साजणाच्या भेटीसाठी मनाचे अंगण बहरलेले ,
मनातल्या सुंदर रंगावलीवर तुझे अस्तित्व उमटवू नकोस ,
हे पावसा असा तू उन्मत ,बेभान होऊ नकोस.. ||२||
मिलनाच्या ओढीने प्रियकर माझा धावत येईल ,
अन् आसुसलेल्या मला त्याच्या गच्च मिठीत घेईल ,
आता धोधो कोसळणारा तू तेव्हा मात्र थांबू नकोस ,
पण आत्ता मात्र हे पावसा असा तू उन्मत ,बेभान होऊ नकोस ||३||

