अनोळखीतून मिळालेली प्रेरणा
अनोळखीतून मिळालेली प्रेरणा
बरचं केलं होतं मी लिखाण
अडगळीत होत सारं काही
वाईट खूप वाटायचं मला
त्या लेखनाला पाहून कधी कधी
एक भली मोठी डायरी
गच्च होती भरलेली
शब्द फुले जणू काही
त्यात कोमजलेली
ध्येय गाठणं बाकी होतं
विचार स्वस्थ बसू देईना
नुसती मनाला आशा होती
पण साथ कोणी देईना
जेव्हा घेतले पुढे पाऊल
तेव्हा सोबतीला नव्हते कोणी
प्रश्न माझ्यासमोर
कवितांना माझ्या समजून
घेईल का कुणी
आजच्या या विषयाची सुरुवात
कळत नाही करू मी कशी
अनोळखी एका भेटीतून
मला प्रेरणा मिळाली अशी
सर्वप्रथम मी आभार मानते
स्टोरी मिररचा:
त्यांच्यामुळे लिहिण्यासाठी
मिळालेली ही संधी
माझ्यासाठी खूप खास आहे
प्रेरणा देणाऱ्या महिलांचा
गौरव करणारा हा
उत्सवाचा दिवस आहे
धन्यवाद....
त्यांची भेट म्हणजे मला
योगायोगच आहे
प्रत्यक्षात आम्ही भेटलो नाही
त्या माझ्या मार्गदर्शक आहेत
माझ्या या प्रिय मॅडमचे
नाव सांगताना
खूप आनंद होतो मला
सौ संगीता भरतकुमार भालसिंग
मॅडमची ओळख ही नव्हती मला
अनोळखीच्या भेटीतून त्यांनी मदत केली मला
प्राध्यापक आहेत मॅडम
हे ठाऊक ही नव्हतं मला
मॅडमना वाचन लिखाणाचा
खूप छंद आहे
हाती लेखणी ओठी चारोळी
साहित्य जणू काही
त्यांचा प्राण आहे
गझल त्यांची ऐकताना
खूप आनंद झाला
युट्युब वर व्हिडिओ पाहून मॅडमचा परिचय झाला
इंटरनेटच्या जगात
मॅडम रमुन जातात सहज
बऱ्याच स्पर्धेत बिझी असतात
तरी दुसऱ्यांना करतात मदत
माणुसकीचे दर्शन
एक छान दिसलं ह्यातुन
आत्म समाधान मिळतं त्यांना
सेवा घडते त्यांच्या हातून
स्वभावाने मॅडम खूप प्रेमळ
आहेत
कविता नाही माझ्या भावना त्यांनी समजलेल्या आहेत
वाटतं त्यांच्या सहवासात
बसून बोलावं त्यांच्याशी खूप काही
बरंच प्रोत्साहन मिळेल
शिकावं असं त्यांच्याकडून
बरंच काही
धन्यवाद मॅडम तुमचे,
आज माझ्या अडगळीतल्या कवितांना
नवा प्राण मिळाला आहे
तुम्ही दिलेल्या प्रेरणेमुळे
मला कवयित्री चा मान
मिळालेला आहे
शेवटी हेच सांगायचंय
पुन्हा एकदा आभार मानून
आपुलकी वाटते तुमची
स्टोरी मिरर ला सांगून
प्रिय संगीता मॅडम
मला सहकार्य केलं तुम्ही
तुमचे बरेच आभार मानले
तरी वाटत मला कमी
आठ मार्चला महिला दिनाच्या
कविता समोर आणल्या तुम्ही
जमलं नव्हतं मला
तेव्हा मदत केली तुम्ही
खरंच तुमच्या मदतीची
आहे मी ऋणी
सदैव सोबत रहा
मार्गदर्शक बनुन
माझे कवित्री होण्याचे
स्वप्न पूर्ण झाले
तुम्ही सोबतीला होता म्हणून
नेहमी अश्याच आनंदी राहा
खुश राहा दुसऱ्यांना आनंद देऊन
तुमचे स्थान महत्त्वाचे
तुम्ही आदर्श प्रेरणा म्हणून.....
