STORYMIRROR

Rashi Raut

Inspirational

3  

Rashi Raut

Inspirational

छोटासा प्रयत्न.

छोटासा प्रयत्न.

1 min
176

जमत नाही मला कविसारख लिहणं

तरीही सुचविल्या काही ओळी

छोटासा हा माझा प्रयत्न

शिक्षणासाठी या चारोळी .


चरण स्पर्श त्या पालकांना

ज्यांना मायबोलीची ओढी

महाराष्ट्राचा अभिमान

मुलांना लाविली मराठीची गोडी .


खिचडी पुरती घराजवळ 

मुळीच नको अंगणवाडी

शिक्षणाचा पाया घट्ट करणारी

हवी आहे आदर्श बालवाडी .


पुर्वीसारखा असावा आदर

शिक्षकांची असावी भीती

नकोच तो ऑनलाईन अभ्यास

पुस्तकांवर हवी खरी प्रीती .


विज्ञानाने माणसाची 

प्रगती झाली बरी

बालके राष्ट्राचा खरा आधारस्तंभ

त्यांना घडवणे ही

जबाबदारी मोठी खरी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational