STORYMIRROR

Manisha Joshi

Inspirational

3  

Manisha Joshi

Inspirational

जगणे

जगणे

1 min
453

आठवणींच्या गर्दीत पुन्हा पुन्हा हरवायचे नसते

स्वत:ला त्यातून बाहेर काढण्यासाठी

वर्तमानात जगायचे असते

आठवणींच्या हिंदोळ्यावरची

सरली सारी वर्षे आता


नवे जगं, नव्या आशा

स्वप्ने ही आहेत नवीन आता

हीच सारी ध्येयं आपुली

याच आपुल्या नवीन वाटा


थबकतील जर पावले आता

भविष्यकाळ तो हरवून जाईल

वर्तमानही सहजच आपुल्या

हातामधुनी निसटून जाईल


म्हणून आहे एक प्रार्थना

भूतकाळ तो विसरून जावा

आज आपला आनंदात तर

भविष्यकाळ हा सुखकर व्हावा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational