STORYMIRROR

Manisha Joshi

Others

3  

Manisha Joshi

Others

जगण्यासाठीचा संघर्ष हा..

जगण्यासाठीचा संघर्ष हा..

1 min
208

जगण्यासाठीचा संघर्ष

प्रत्येक प्राणीमात्राचा 

मनुष्याला वाटते, माझ्याच वाट्याला आलेला

इवलीशी मुंगीसुद्धा संघर्ष करत जगते

छोटासा कण नेताना किती वेळा तरी पडते.

झाडेसुद्धा जागा नसेल तर वेडीवाकडी वाढतात.

झाली वाकडी मुळापासून कुठे ती कुरकुरतात?

कापली क्रूरपणे, तरी फुलतात, बहरतात

सर्वांचे आश्रयस्थान बनतात, भरभरून आनंद देत राहतात.

प्रत्येकजण इथे जगण्यासाठी संघर्ष करत असतो

मनुष्यमात्र फक्त त्याचा बाऊ करत असतो.


Rate this content
Log in