मला पंख असते तर...
मला पंख असते तर...
1 min
799
मला पंख असते तर...
उंच आकाशी झेपाऊनी
दूर दूरच्या देशांमधूनी मनसोक्त मी फिरलो असतो
अथांग सागरावरूनी कधी तर तरू मधूनी विहरलो असतो
सग्या सवंगड्यांच्या साथीने किलबिलकिलबिल गायलो असतो.
थकूनी मज कधी वाटले नको हे सारे..
पंख पसरूनी मग मी माझे ऊंच तरूच्या
फांदीवर निवांत एकटा बसलो असतो.
पंख पांघरूनी अलगद माझे जगापासूनी थोडे दूर
माझ्यातच मी हरवलो असतो.
