कन्यादान
कन्यादान




कन्यादान शब्द ऐकताच हृदयाला पीळ पडतो
गुणी माझं बाळ दानास पात्र कस ठरतं ?
मुलीवर पाणी सोडणे यात पुण्य कसलं ?
किती तरी प्रथा, काळानुसार बदलल्या
या प्रथेत अजूनही आपला समाज अडकला
का, कशी, कुणी सुरू केली प्रथा?
एकविसाव्या शतकात थोडेतरी बदला
प्रवाहाविरूद्ध जाऊन लेकीचा सन्मान करा.
दान म्हणून लेकीला नाही कुणाला द्यायचे .
जोडीदाराच्या तिच्या,प्रेमाने तिचा हात द्यायचे
दान नाही केले तुला तुम्ही दोघे आहात समान, हे तिला सांगायचे.
निरोपाचा क्षण आनंदाचा आणि आश्वासक करायचे.