प्रवास...
प्रवास...
1 min
247
प्रवास जन्मापासून मृत्युपर्यंतचा
कधी ना कधी मुक्कामी पोहचवणारा
असा हा प्रवास आनंदाचा
आपणच करावा कधी
निसर्गाशी एकरूप होत कधी
माणसांशी मिळते जुळते घेत
प्रत्येक क्षण भरभरून जगावा
सोबतच्या सहप्रवाशांनाही हर्ष व्हावा.
आलाच एखादा क्षण दु:खाचा
थोडा विसावा घ्यावा उभारून
मनाला पुढे प्रवास चालू ठेवावा.
प्रवास संपल्यावरही प्रत्येकाला
आपल्या पाऊल खुणा ओळखीच्या वाटाव्यात.
