अपयशानंतर
अपयशानंतर
अपयशापेक्षा
अपयशानंतर येणारे
अनुभवच खूप काही शिकवतात
आपले परके इथेच कळतात
जवळची माणसे स्मित करतच
अंतर ठेऊन वागतात
अपयशाला असते पहाट हे ते विसरतात
अपयशातून माणूस शिकत जातो
आणि एक दिवस...
त्याच्या स्वप्नांना गवसणी मात्र नक्की घालतो...
