STORYMIRROR

Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

झुंज माझ्या आयुष्याची

झुंज माझ्या आयुष्याची

1 min
716

"जगी सर्व सुखी कोण आहे 

विचारी मना तूच शोधून पाहे"


हे आठवुनी झुंज माझ्या आयुष्याची देत आहे

संकटे लादली नशिबाने बालपणातच

तेव्हा अज्ञानी होते मी मनात

कठीण परिस्थितीला झुंज देऊनी पूर्ण केले शिक्षण

नियतिचा खेळ ही होता विचित्र

संघर्ष सोडत नव्हता माझा पाठलाग


मी ही खंबीर होत गेले प्रतिकारास

सासरी जरा सुख येताच झाला सासुरवास

शिक्षण पूर्ण करायचे म्हणून मूग गिळून बसले शांत


लेकीच्या जन्माने झाले धन्य, शिक्षणात यश मिळुनी नोकरी मिळाली झटकन

तेथे ही झुंज द्यावीच लागली, डगमगले नाही मुळीच कारण संघर्ष मुरला होता अंगात


झुंजत झुंजत आयुष्य पुढेच जात राहिले  

टप्प्या टप्प्याचे क्षणिक सुखही प्राप्त झाले

नशिबाचे खेळ होते सारे पण स्वावलंबनाच्या हिंमतीवर झुंज देत राहिले


वाटे झुंज देणे संपले पण नाही अधून मधून संघर्ष वादळे येतच आहे पण मी बिनधास्त आहे

कारण झुंजच माझे एक आयुष्य झाले आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational