संसाराचा गाडा( चित्र काव्य)
संसाराचा गाडा( चित्र काव्य)
*संसाराचा गाडा*
संसाराचा गाडा हाकतात
माझे आई -बाबा नियमीत
कष्ट किती दोघें उपसतात
मुलांना नाही कधी कळवीत.
ठेच लागली या भूक लागली
की आठवते सारखी आई
बाळासाठी काहीतरी करून
भूक भागवायला तत्पर बाई.
मित्रासंगे चैनीला पैशासाठी
साठवणीतली कवडी दमडी
हळूच देऊन हौस बाबा पुरवीत
तेव्हा बाबा वाटे माझे सवंगडी.
आई-बाबा मुलांच्या सुखासाठी
रोज कष्ट करून पैका मिळवतात
चांगला खाऊ द्यायला आई कसते
रुबाब ऐट राखण्या बाबा खपतात.
इच्छा माझी एकच देवा पुरी करा
शिकून सवरून ऑफिसर होईन
सर्व सुखसोयीनी समुद्ध करण्या
आईबाबा साठी मी तत्पर असेन.
शोभा वागळे
मुंबई.
8850466717
