खेळू मैदानात
खेळू मैदानात
*खेळू मैदानात*
चला मित्रांनो या रे या
लवकर भरभर सारे या.
आज जाऊ मैदानात
खेळ खेळुया जोमात.
मैदानात धाऊ,उड्या मारू
आनंदी सारे गाणे गाऊ...चला मित्रांनो...
पकडापकडीचा खेळ खेळू
लपाछपीचा खेळ रंगवू
झाडामागे लपून बसू
पकडणाऱ्याला खूप दमवू ..चला मित्रांनो..
मौज मस्ती असे खेळात,
आनंद पहा किती मुलांत!
खेळाने वाढते ताकत
मनाची
इच्छा होते मग अभ्यासाची ...चला मित्रांनो...
क्रिकेट - फुटबॉल खेळ मैदानी
रविवारी खेळायचे सगळ्यांनी
सापशिडी ,कॅरम,पत्ते,बुद्धिबळ
घरात खेळायचे आपण बैठे खेळ...चला मित्रांनो...
मोबायल खेळ नको आम्हाला
डोळे नको बिघडून घ्यायला
अन् आई-बाबांनी नको ओरडायला
मैदांनी खेळाने शक्ती येते शरिराला..चला मित्रांनो..
शोभा वागळे
मुंबई.
8850466717
