दयावान वृक्ष
दयावान वृक्ष
विषय:- चित्र काव्य
शीर्षक :-दयावान वृक्ष ( अष्टाक्षरी रचना )
*दयावान वृक्ष*
फार जुनाट हा वृक्ष
झाली बघा जीर्ण दशा
खोड वृक्षांचे सुकले
किती पहावी दुर्दशा.
उंच डोंगर पायथा
मागेघनदाट रान
मात्र एकटा वेगळा
तिथे उभा सुनसान.
दयनीय परिस्थिती
तरी फांद्या उमटल्या
मूळ रोवून राहिला
परिक्रमा बदलल्या.
किती सुंदर संदेश
पहा माणसा वृक्षाचा
दयनीय स्थितीतही
वृत्ती सारखी देण्याचा.
निसर्गाची ती करणी
खोडावर उमटली
इवलीशी ती पालवी
तग धरून उठली.
रोपट्याच्या नियमाने
हळू हळू ते वाढले
जुन्या वृक्षाच्या मुळांनी
अन्न पाणी पुरवले.
वृक्षा पासून शिकावे
दुसऱ्यांना देत जावे
सदा आपल्या लोकांना
वृक्षा सारखे झटावे.
शोभा वागळे
मुंबई.
8850466717
