STORYMIRROR

Nishigandha Kakade

Abstract Action

3  

Nishigandha Kakade

Abstract Action

इच्छा

इच्छा

1 min
377

इच्छा काय करू देवा मी ?  

जन्म मृत्यू तुझ्याच हाती!  

नशीब फक्त माझे लिहितो मी, 

करून कष्टाची भटकंती. 


श्वास दिलेस ,आस दिलीस, 

जगण्याचे बळ ही दे तू, 

मदतीचा हात दिलास, 

फक्त सोबत राहा तू. 


जगताना हर एक पावलावर, 

कर्म माझे मजपाशी, 

पाप पुण्याच्या हिशेबावर, 

नक्की जाईल मी गंगा स्नानाशी. 


इच्छा मरण तू द्यावे , 

प्रेमाने तू जवळ घ्यावे, 

कानाशी तू समजूत द्यावी, 

जगलो, हरलो ,संपलो मी म्हणावे. 


निष्ठूर मी आणि मन माझे , 

गाईन तरीही गाणं, 

 तुझे स्तुती सुमनांचे, 

डोळ्यात आणून प्राण!  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract