STORYMIRROR

Nishigandha Kakade

Abstract Fantasy

3  

Nishigandha Kakade

Abstract Fantasy

तू

तू

1 min
417

माझा समुद्र आहेस तू ,

अगदी अथांग अनंत,

कधी गंभीर कधी संथ,

उसळणाऱ्या लाटांसारखा ,

फेसाळणाऱ्या तरांगांसारखा,

कधी नितळ,कधी अस्पष्ट,

कधी झंझावात तुझा,

कधी शीतल प्रीती,

मोहून टाकणारा तुझा भास कधी,

कधी उगाच हळवे करणारे क्षण!

एकांतात वसलेली कधी कविता तू ,

कधी गर्दीतून फुलणारी गाणी तू,

नुसतं पावलांनी भिजाव तुझ्या स्पर्शाने,

मनाने देखील भुलावे तुझ्या दंशाने,

निर्मिती तुझी माझा अंत असू दे,

तुझ असणं नसणं फक्त माझ्यातच वसू दे! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract