STORYMIRROR

Nishigandha Kakade

Abstract Inspirational Others

3  

Nishigandha Kakade

Abstract Inspirational Others

झेंडावंदन

झेंडावंदन

1 min
191

झेंडावंदन हा समोर पाहुनी,

ना येई आता शहारे उरी!


तीन वर्षांची ही पाठशिवणी,

रोग कसला हा जडला संसारी?


मनास धीर हा अजुनी आहे,

गरज आहे फक्त जबाबदारीची


सगळीकडे दिसे गर्दी च गर्दी ,

दवाखान्या पुढती रांगा दिसती


जबाबदार कोण? विचारता स्वतःस,

गुपचूप धरती मग बोट तोंडावरती


घरात बसुनी थकले सारे,

गांभीर्य ही आता कमी पडे


नाकावर्ती भीती बांधूनी,

कोवळे जीव घेती ऑनलाईन धडे


अभ्यासाचा खेळ पाहुनी वाटे,

जाहले कुपोषित भविष्य देशाचे

 

कुठले ते सुगंध पुस्तकांचे,

कसली ती तयारी परीक्षेची?


वर्गामधले ना पाढे माहीत,

ना कळे मैदानातील पाठशिवनी!


बक्षीस भेटती , स्टार्स आणि स्मायली,

ट्रॉफी आता अडगळीत पडे,


डबा दप्तराची खरेदी ना कळाली

पळाली भीती मास्तरांच्या छडीची


शिकाया आता ना दटावनी लागे,

ना लागे अभ्यासाची गोडी!


मनापासुनी कर जोडूनी,

सांगावे वाटे त्या ईश्र्वरासी


थांबावं रे हा खेळ जीवाचा,

बनव सृष्टी परत पुन्हा तशीच


जिथे ना गुदमरतो जीव ,

ना वाटे भीती बागडण्याची!


पुढचा स्वातंत्र्य दिन जावो सुखाचा,

ना असो नाकावरूनी कोणता बांध


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract