STORYMIRROR

Nishigandha Kakade

Drama Tragedy Fantasy

3  

Nishigandha Kakade

Drama Tragedy Fantasy

पुन्हा असेच वाटते!

पुन्हा असेच वाटते!

1 min
881

कवाडे उघडून मनाची,

भूतकाळाची धूळ सारी,

लख्ख करून अंतरात,

मज पुन्हा स्थिरावे वाटते!


बंध सुखाचे कापूनी,

मज दुःख पांघरावे वाटते,

भूतकाळाच्या काळोखात,

मज पूर्ण विरावे वाटते! 


जुने अंतरीचे घाव सारे ,

फेकुनी दूर क्षितीजावरी,

धुंद जगात रमुनी आता,

मज पुन्हा बरसावे वाटते!


प्रखरता ही क्षणा क्षणाची,

जनिवेतूनी सदाच छळते,

मग मरहम बनुनी तू यावे,

हा भास पुन्हा व्हावा वाटते,


जन्म जन्माचे नाते स्मरूनी,

साथ तू द्यावी समजुनी,

वाट दिसता तुझी परतुनी,

मज पाशी संपावी वाटते!


सुगंध फुलांचा दरवळतो,

मजला मी तशीच मिळावी,

तुझ्या सोबतीने बहरावी,

ही आशा पुन्हा जन्मावी वाटते!


करमणूक ना हा जीव,

ना आहे कठीण परीक्षा,

मिटवावे अंतर मनाचे,

मज असेच व्हावे वाटते,


मज पुन्हा असेच व्हावे वाटते! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama