STORYMIRROR

Dnyaneshwar Bandgar

Drama

3  

Dnyaneshwar Bandgar

Drama

वेशीपर्यंत आलायस

वेशीपर्यंत आलायस

1 min
201

*वेशीपर्यंत आलायस...*

*आता नव्या नवरीसारखा लाजू नकोस...*

पटकन माप ओलांड आणि आत ये...

कंजूसपणा करू नको....

दिल खोलके बरस...


येताना चोर पावलांनी नको,

राजासारखा सनई चौघडे वाजवत ये...

येता-येता सगळ्यात आधी शेतातल्या

एखाद्या घरात डोकाव...

तू आल्याचं कळताच तिच्या काळजात चर्र होईल...

एरवी आभाळातून बरसणारा तू

तिच्या डोळ्यांतून बरसशील...

ती तुला मनातल्या मनात एखादी

कचकचीत शिवीही देईल,

पण तरी पण तिथे थांब...

कारण तिचा धनी गेल्यावर

पोराबाळांसकट सगळ्या संसाराचा

गाडा तिलाच ओढायचाय...

म्हणूनच तिच्या शेतात सगळ्यात आधी जा...

आणि तिथल्या मातीत रुजून राहा...

मग रानावनांत पड,

रस्त्यारस्त्यांवर पड,

खिडक्यांना पागोळ्या होऊन लगड...

नद्या भर, विहिरी भर,

धरणाचे दरवाजे उघड...

हंड्या घागरींतून बरस,

गच्चीतल्या टाकीवर बरस,

म्युन्सिपाल्टीच्या नळांतूनही बरस...

धन-धान्यासाठी ये,

छत्र्या, रेनकोटच्या बिझनेससाठी ये,

सगळी अर्थव्यवस्था बळकट करायला ये...

पानाफुलांना सजव,

गाईगुरांना भिजव,

पक्षी-पाखरांना नाचव...

आसुसलेल्या मनांना रिझव,

सुकलेल्या ओठांनाही भिजव...

सगळ्यांना पाणी दे,

प्रेमात पडलेल्यांना गाणी दे,

फेसबुकवर टाकायला तुझ्याबरोबरचा सेल्फी दे...

वाफाळलेल्या चहासाठी ये,

गरमा-गरम भज्यांसाठी ये,

शेगडीवरच्या कणसासाठी ये...

*तुझी सर्वजण आतुरतेने*

*वाट पाहत आहेत...*💐


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama