STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Drama Romance

4  

swati Balurkar " sakhi "

Drama Romance

वय

वय

1 min
257

वयाचा संबंध नसतो प्रेमात

असं किती जण म्हणतात रे?

तू मात्र ते वागण्यासही सिद्ध

तुला नसेल फरक पडत

पण मला पडतो!


तुझ्यासाठी वय ही एक संख्या

कारण तू माझं तरूण मन पाहतोस

मी मात्र साजर्‍या केलेल्या, न केलेल्या

वाढदिवसांच्या हिशोबात अडकलेय

मनात वाटतं कधी कधी

तुझ्यासारखं जगता यावं

वयाची व समाजाची लक्तरं झुगारून

त्या माझ्यातल्या तरूणीला 

बिनधास्त बाहेर काढावं!


पण असं नसतं ना रे जगणं

देणं लागतो आपण सगळ्यांचे

मी तरी लागते असं वाटून राहतं!

तुला नसेल फरक पडत वयाचा पण

मला पडतो. . . इतरांना पडतोच!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama