STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Romance Tragedy

3  

swati Balurkar " sakhi "

Romance Tragedy

वेगळं

वेगळं

1 min
183

घरात रोज काही वेगळे

आणि आयुष्यातही काही वेगळे

घडत होते तू सोबत असताना. .!

उध्वस्त झालीय दिनचर्या आता

तुझ्या जाण्याने. .

दिवसाला तसा चेहराच नसतो हल्ली

सुर्योदय व सूर्यास्तातलं अंतर कळावे

तेवढंच जगतो आहोत आम्ही!

माझे निरोप पोहोचतील का तिथे?

शोधू मी तुला कुठे कुठे?

कुणीतरी जाऊन सांगा त्याला सगळे

त्याच्याविना जीवनातही

घडत नाही काही वेगळे!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance