पानगळ
पानगळ
1 min
69
कसली क्रूर पानगळ
घडली आयुष्यात
पिकल्या पानांसोबत
हिरवं पानही गळालं!
अगतिक आयुष्य अन
असह्य जीवन!
देवा-
आता एवढंच मागणं-
यापुढे तरी बागेत माझ्या
आनंदाची फुले उमलावी,
अन् हो तिथे
क्षणिक दुःखालाही
जागा नसावी!