STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Tragedy

4  

swati Balurkar " sakhi "

Tragedy

निरोप

निरोप

1 min
351

तू निरोप घेतलास तेव्हा

भिंतींशिवाय कुणीच नव्हतं

ना साक्षीदार ना सोबती,

तुलाही अन मलाही!!

तू निघालाच होतास 

महायात्रेवर ,

मग मी बापडी

थांबवणार कशी ?

किमान एक दुसरा खांदा 

मला रडायला असेल 

अशीही वेळ नव्हती ,तुझ्या जाण्याची

कसली शिक्षा दिली असेल नियतीने 

तुला व मला अन आपल्या प्रेमाला!

ती वेळ टळायला हवी होती रे!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy