माहेराची वाट !!माह्य माहेर माहेरकाय सांगु कस
माहेराची वाट !!माह्य माहेर माहेरकाय सांगु कस
माह्य माहेर माहेर
काय सांगु कस ?
लय मोठा तो वाडा
नाही शेहरातल खुराडं
अंगणात जोडीबैल
गोठ्यात गाई गोर्ह
लय मोठा तो पिंपळ
दिवा लावे तडी
म्हाई माय दोन्हीं सांज
वृदांवनी तुळशीमाय
जसा पवित्र्याचा वास
माय बाप वारकरी
पहाटेच होते त्यायची
देवपुजा ते येगळी
कधि काकडा आरती
कधि हरिपाठचे सुर
घुमती घरात
दोन्हीं सांज दिवाबत्ती
होते म्हाया माहेरात
दुध दुपत लय होते
जसा गोकुळाचा थाट
लय मोठ्या रांजणात
माय घुसळते ताक
घरामंधी राहत्यात
धांन्याची लय पोती
कधी कापुस गंजी भर
कधि मक्याच्या त्या राशी
राबता लोकायचा काय सांगू
राहतो किती ,
चुल्ह्यावर राहतो उकळत चहा
दिनराती
म्हया बाप साधा शेतकरी
पण मान त्याचा लय मोठा
चार गावाच्या वेशीत
माय आहे म्हाई
अन्नपुर्णे वाणी
तिच्या दुळ्लीत आहे भाकर
द्रोपदीच्या थाळी वानी
येता कुणिबी दारात
जायेना कधि उपाशी
संसार केला तिचा निगुतिन तिन
वाढल मानसाच गोत
आली लक्षमी चवरी घेऊन
नाही सर माह्या माहेराची
या जगात कशाले
असुदे ते इमले
कितीबी मजली देखने
मन धाव घेई तिथ
जाया मायच्या कुशित
पन आता म्हाय नाही
माहेर राहील
माह्या संसारात म्ह्या
देहाच हे चाक रूतल
मन जाते ऐकटच पाखरावानी माहेरी
गाते मी उदास होऊन फक्त माहेराची गानी
