सुर्य मी दिगंताचा
सुर्य मी दिगंताचा
भेदन्या अंधार मनिचा
निर्धार आज केला
होईन मीही सुर्य दिगंताचा ..
येवोत वादळे किती
मज अस्ता न्यावयाला
अंधार दाट होवो..
मज किरणे थांबवाया
होऊन सुर्य मी ..
उगवेन रोज नव्याने
आत्म प्रकाश माझा
आणेन प्रभा नव्याने
तेजोवलय माझे
असे सकारात्मकतेचे
मग हि प्रकाश किरणे
भेदतिल किती मळभ
निराशल्या मनिंचे..
मज व्हावयाचे
सुर्य..दिगंताचा..
या विश्वास दावण्या दिस
तेजोमय स्वधर्माचा ..
