```● अराजक स्विकारतो मी ●
```● अराजक स्विकारतो मी ●
अराजक स्विकारतो मी ,
असत्य स्विकारतो मी
कुठे कागद काळे
कुठे नोटांचे ढिगारे
मला लुटणा-या
कुठे अडतो मी ??
अराजक स्विकारतो मी
कुठे तत्वांनी ते जिवंत रहावे
ज्ञान मंदिरात ही
शिरले किती भ्रष्ट
विकणे सत्यास ही
स्विकारले कसे मी ?
अराजक स्विकारतो मी
लोकशाहीत हे
कसले रे जगणे
लांडग्याच्या लबाडिलाही
भाळतोच मी --
अराजक स्विकारतो मी
भिकेला का लागली
सारी तत्वे नी मुल्ये
खेळ भ्रष्टांचेच
सारे उघड्या डोळ्यां
पाहतो मी ..
अराजक स्विकारतो मी
लांब नाही थांब
तुझाही तो उंबरा
जिथे चालेल हा ची
खेळ नागडा
हक्कांची तुझ्याही
होईल पायमल्ली
तरी हि का
अराजक स्विकारतो मी
आवाज तु
आत्ता तरी उठवशिल का
सत्याची साथ देत
सत्याचा मार्ग
स्विकारशिल का
व्हावे लागेल सैनिक
तुला सत्याच्या आग्रहा साठी
नाही तर ...
नाही तर लोकशाही
टांगलेलीच राहिल वेशी पाशी
नावालाच .....
मृतावस्थेत ,मरनासन्न !!!!```
सारू ☆☆
