पाचविला पुजलेला संघर्ष..बालपणिच गेली आई..
पाचविला पुजलेला संघर्ष..बालपणिच गेली आई..
पाचविला पुजलेला संघर्ष..
बालपणिच गेली आई..
सावत्रपण पदरी पडल.
मोठ होता होता बालपण
कळलच नाही कधि सरल.
संघर्षाची नात्यातल्या
परत नव्याने ओळख झाली
उंबरठा ओलांडून येता सासरी
संघर्ष भेटला उंब-यावरी.
बायको ,आई ,सुन
या नात्यात ती वाटली गेली
परिस्थितीच्या जात्यात
ती कित्येक वर्ष भरडली गेली
झूल जबाबदा-यांचे ..
कष्टांची ती अविरत सोबत
संसार सुखाचे स्वप्न धुसर
व्यसनिंनचा तो सोबत वावर
पिळवटून टाकले स्त्रिपण
माया ममता आणि सोसणे
हेच बनले मग तिझी ओळख
संघर्षाचा झाला आता कहर.
आयुष्याच्या या वळणावर
अखेर संघर्षातच सोडले प्राण
तिच्या सहनशितेन ति
फक्त ठरली महान ,
ठरली महान..
