आहे कुठे राम तरी ..
आहे कुठे राम तरी ..
ऐक फक्त्त जय घोष
आक्रोश ऐकू नकोस
बघ फक्त पातक
चीर हरण चिमुकली पासून सत्तरितल्या ती च ..
म्हणे अस्तित्व तुझं चरा चरात
कुठे आहेस??
आचरनात..रामा आहेस फक्त मंदिरात
तुलाही कोंडलय रे चार भिंतीत ..भव्य
तुला भरजरी वस्त्र ..बाहेर मात्र
तुझी लेकरं निरवस्त्र ..
तुला रे नैवद्यात पंचपक्वान्न ...
लेकरे तुझी पोटभर अन्नासाठी लाचार
बघ तुच आता ...
कस हे सगळच चालतय तुला
तुझ्या बरं राज्यात ??
अनाचार ,अत्याचार ,भ्रष्टाचार
असत्य ,लबाडी ,लुबाडणुक,लाचारी....
नको रे ..असा निष्ठूर होऊस ...
रामराज्याच्या नावाखाली आहे कुठे ? राम तरी ....
