ऐक राखी अनोखी ओंजळीत भरलेत मोतीआताश्या राखीत य
ऐक राखी अनोखी ओंजळीत भरलेत मोतीआताश्या राखीत य
आताश्या राखीत येत नाही भाऊ
एकटाच तो आणि बहिणी आम्ही तिन
पोस्टान जाते राखी आणि
फोन वर होतो संवाद ,
दिवस भर हँप्पी राखी चे
वाजतात मँसेज फार
पण आज जरा वेगळ
रक्षाबंधन अनुभवल
अनाथ आश्रमात जाऊन मला
हरवेल्याला नात्यांच मोल कळल
आधि पायान अधु असलेल्या
सत्तरीतल्या मेरीन राखी बांधली
नंतर आली मोना
जी म्हणायची मला
मम्मी –
नंतर पुष्पा ,उषा ,सोफीया आणि
रूक्सार
सा-यानींच राखी बांधुन
घेतल वचन ऐक
अशीच येत जा भेटायला
बनुन कुणाची तरी लेक
नंतर पुरूष विभागात गेले
पाहिले चेहरे आसुसलेले
बांधत होती राखी
तेव्हा किती तरी
डोळ्यातून अश्रू आले
बोलता कुणाला येत नव्हत
कुणाला डोळ्यांनी दिसत नव्हत
पण चेह-या वरच समाधान
मला त्याच्याही दिसत होत
अनेक वर्ष झाली होती घर
सोडून त्यांना
आठवत होती बहिण कुणाला
कुणाला आठवत होती लेक
एक हात आशिर्वादाचा
सहज फिरला डोक्या वरून
येत जा पोरी अशीच
कधि तरी बनून लेक
हि अशी राखी आज साजरी झाली
एका भावाची बहिण मी आज
कित्येकांची बहिण झाले--
