सखे कविते...सखे कविते बरी भेटलीस तू मैत्रीचे
सखे कविते...सखे कविते बरी भेटलीस तू मैत्रीचे
1 min
6
सखे कविते बरी भेटलीस तू
मैत्रीचे हात जेव्हा सुटले
कितीतरी मागे...
आयुष्यात एकटेपण आलं
नात्यांची गर्दी ओसरली
असलेल्यांची गरज संपली
उसासे, आनंद, दुःख
सारच तुझ्यातून
तुझ्या सवे वाटलं
केलेत बांध मोकळे अश्रूचें
मनातली किलमिष केलीत
तुझ्या स्वाधीन
शोधली शब्दांनी
मैत्री... परत
तुझ्यात..
हवी असतेस तेव्हा
उतरतेस काळजातून
सारच घेतेस वाटून
निमूट पणे
शब्दा शब्दातुन...कविते..
