संक्रातीच वाण..
संक्रातीच वाण..
संक्रातीच वाण ..
आली संक्रात वाणं लुटुया
प्रेमाच ,सहयोगाच
कुठे कुढावे कडू बोलाने
विसरून जावे सारे दुरावे
गोडवा स्नेहाचा पसरूनी द्यावा
अंतर उरि ना कुणास द्यावे
सुर्या सम संक्रमण करावे
प्रकाश द्यावा आशेचा
उब प्रेमाची नि आपुलकीची
द्यावी रंजल्या गांजल्यानां
काटे असु लाख नात्यांचे
पण गोडवा जागऊ स्नेहाचा
तिळगुळ देऊ ,तिळगुळ घेऊ
गोड गोड बोलू ..
हाच आग्रह संक्रांतीचा….
