सहनशिल बायको ?#जनता !!
सहनशिल बायको ?#जनता !!
सत्ता येते जीवनात दिलेल्या मतातुन
निवडणुकीच्या लग्नात
संसार नवा थाटतो..
घेतो भावी सत्ताधिश
आनाभाका...देण्याच्या
रोटी कपडा और मकान
सोबत मोफत कि बडीसी दुकान
गळ्यात पडता जय माळ
होतो मग सारा अंधार..
ओळखच विसरतो नवरा
जनता बसते कुढत..
तिच्या आक्रोशाला
मग नाही कुणी वाली उरत
सत्तेच्या माजात
असतो तो सत्ता उपभोगत
नशा सत्तेची भिणते डोक्यात
हुकुमशाही माजते झोकात
जनताच राजा म्हणणारे
जनतेलाच भिकेला लावतात..
नवे नवे कायदे डोक्यावर नाचवतात
जनता होते लाचार
जेव्हा सत्ते साठी
लावला जातो सवतीशीच पाट
मग चांडाळ चौकडी एकत्र येते
आरोपांची होतात फुलें
भ्रष्टाचाराचा चिखल
अचानक स्वच्छ होतो
जनता बसते गांधारी होऊन
सोसणं नशिब तिचं
काही खर नाही या
लोकशाहीच..
प्रश्न जनता नाही विचारत
कुठलाच हिशेब नाही मागत
मान खाली घालुन करते संसार
पाच वर्षानीं परत तेच
नवरदेव नवा ..वचनं तिचं
डाव नवा..
हार जनतेचीच ??
