STORYMIRROR

saru pawar

Abstract Others

3  

saru pawar

Abstract Others

माझी होऊ पाहणारी कविता

माझी होऊ पाहणारी कविता

1 min
21


ऐखाद दिवशी

शांत मनात

ऐखाद दिवशी शांत मनात

रूंजी घालतात शब्द

 क्षणा क्षणात नव नव्या कविता         

 मनाच्या कवाडावर धडकतात..

 पण जरा हे झाल्यावर म्हणते लिहू

तर दत्त म्हणून शिरते आशा घरात

सोडते हुकूम लगेच ताडस्वरात

"ते काय तुमच नंतर करा ,

आधि माझ काम काढा 

उष्टि भांडी रिकामी करा

कपडे धुवायचे ते टाका 

तुमच काय ते नंतर करा "


मी आपली घरातल्यांच आटपत बसतेच जरा पेन घेऊन 

कि घेते हि तेवढही मिळालेल

माझ स्वातंत्र्य हिराऊन


हो तिच तरी काय चुकत

माझ्या या वेडाला 

कोण बर पैश्यात मोजत?

नुसतिच आपली हौसती

नुसतेच ते उमाळे

कागदावर उमटणारे

मनातले ते धुसर पसारे


बर तिच सगळ संपवत 

परत येते पेना जवळ

पण तो आत्ता 

लिहायचच नाकारतो

कारण सुचलेल्या दोन ओळिनां

आता आठवणच मेंदू नाकारतो.


मग ,मग उरतात पानावर

दोन तिन ठिपके फक्त

आठवतानां डोक्यातल

पेन आपटत 

तेवढच फक्त उमटत -- 


 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract