जीवन सार्थक कि निरर्थक…
जीवन सार्थक कि निरर्थक…
उरी येऊन मातेच्या जन्म मिळाला आम्हा
सोहळे साजरे या जन्माचे
कौतुक बघा किती देहाचे
आनंदाचे गातो गाणे
परत नव नव्या या जीवनाचे
जन्म आणि मृत्यूच्या मधला
काळ म्हणतो आपण जीवन ज्याला
झिजला देह किती सेवेसी
अश्रू किती नयनांचे पुससी
हास्य मुखांवर आणले किती
कि क्रोधाने काळीज तोडले
कोमल नयनी अश्रू दिधले
लोभाच्या वाटां वर कुणाचे
हक्क बघा ते काबिज केले
तोडला कि जोडला विश्वास
हिरावाले छत्र की सावली दिली
प्रेमाची नी उब मायेची ..
गोळा बेरीज सरते शेवटी
जिवन लागले सार्थकी
कि निरर्थक हे झाले जीवन
जोडले कुणाशी ना नाते क्षणभर
