STORYMIRROR

Ramesh a Chavan

Tragedy Others

4  

Ramesh a Chavan

Tragedy Others

खरंच गावाकडील सुख हरवलं का

खरंच गावाकडील सुख हरवलं का

1 min
4

एकेकाळी होत गावचं गावपण सुखाचं आनंदाचं

कारण सगळे गुण्यागोविंदाने नांदत होते एकत्र

पण आज काल सगळं संपत चाललंय हळूहळू

खरंच की काय गावाकडील सुख कुठे हरवलंय का!!१!!


सकाळ सकाळ ऐकायला येणार कोंबड्याची बांग

गाई गुरांचा तो चरायला जाणार एकत्र कळप

आता हळूहळू कमी होऊन दिसेनासा झालाय

कारण आता गावी कुणी मानस उरली नाही!!२!!


रात्री पडवीत बसून रंगणाऱ्या म्हाताऱ्याच्या गप्पा

जुन्या पीड्यांच्या आठवणींना उजाळा देत होत्या

पण तेच आज ओठे कायमचे सुनेसुने झालेत 

कारण आता गावी कुणी मानस उरली नाही!!३!!


एकट्याच पडल्या त्या जुन्या पायवाट पुन्हा

कारण चालणारी पाऊले तिकडे फिरलिच नाही

अजून ही वाट पाहतात पण कुणी जातच नाही

कारण आता गावी कुणी मानस उरली नाही!!४!!


सरसर काठी तळ्यात मळ्यात आईच पत्र

खरंच सगळं काही कुठेतरी हरवून गेलं फक्त

लहानपणीचे खेल फक्त आठवणीत राहिले

कारण आता गावी कुणी मानस उरली नाही!!५!!


भरभरून सोनं उगवणारी आपली काळी आई

आज तडा जाऊन फक्त ओसाड पडली आहे

पण आता काबाडकष्ट शेतात घाम गाळेल कोण

कारण आता गावी कुणी मानस उरली नाही!!६!!


खरंच देवा स्वर्गाहून सुंदर गावाला काय झालं

सगळं काही गावी असताना का पाठ फिरवली 

पुन्हा माझा गाव आणि तिच मानस येउदे पुन्हा

ओसाड पडलेला गाव माझा पुन्हा परत फुलू दे!!७!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy