STORYMIRROR

Ramesh a Chavan

Romance

3  

Ramesh a Chavan

Romance

बंध प्रेमाचे

बंध प्रेमाचे

1 min
170

नाते जुळले तुझे माझे मनाचे

प्रेम गीत ओठी अबोल प्रेमाचे

गुंतून गेला जीव असा जीवात 

गुंफत गेले बंध असे भावनांचे!!१!!


बघते चोरून अशी तू लपुनी

नजर फिरते ही कवरी बावरी

भिडता नजर नजरेला अशी

लाजेने नकळत स्वतः सावरी!!२!!


उगाच हसता गाळी खुदकन 

रूप खुलवून दिसे साजिरी

गाली प्रीत खुले ही प्रेमाची

प्रेम पाखरु फिरे हृदयंतरी!!३!!


निःशब्द भावनांचे प्रेम तुझे

वेध घेती नकळत हृदयाचा

तुझ्या हृदयाची ही स्पंदने

ठाव घेती माझ्या मनाचा!!४!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance