STORYMIRROR

Ramesh a Chavan

Thriller

3  

Ramesh a Chavan

Thriller

एक रात्र पावसाची

एक रात्र पावसाची

1 min
16

बेधुंद अशी ती रात्र मुसळधार पावसाची

शहारल्या क्षणांची बेभान वादळाची

गेली करुनी चिंब सर रातच्या घनांची

पुन्हा एकदा बरसली ती रात्र पावसाची!!१!!


सुटला असा तुफान सोसाट्याचा वारा 

अंधाऱ्या राती नभी मेघ आले दाटून

शहारले अंग जोमाने दाटला हवेत गारवा 

कडकडाट नभांतरी जाई काळीज फाटून!!२!!


अजूनही घुमतो कानी तो नाद गर्जनांचा

लाजुनी ती सौदामिनी घेई आडोसा घनाचा

नकळत अंधाराला चिरत अशी जोमाने

नुसता तांडव करी नभी गर्जनांचा!!३!!


ओथंबूनी बरसला मेघ वर्षाव भूवरी

दरवळला सुंगध सुवासिक मातीचा

लाही लाही झालेल्या त्या देहाला

शांत करी स्पर्श होऊन त्या थेंबाचा !!४!!


कोलमडले सारे जे उभे होते भूवरी

सावराया नाही मिळाली उसंत क्षणाची

अजून ही मनात काहूर दाटते भीतीचे

अशी एक होती रात पावसाची!!५!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller