STORYMIRROR

Ramesh a Chavan

Romance

3  

Ramesh a Chavan

Romance

डाव मधुचंद्राचा

डाव मधुचंद्राचा

1 min
10

ढळला हा मावळतीचा सूर्य

निशाला पाहून चंद्र हसला

मिणमिणला कोपऱ्यात दिवा

रातकीडा त्यावर सरसावला !!१!!


निःशब्द झाली रात अशी

एकांत आज हा लाभला

मिळता नजरेचा तो इशारा

खेळ प्रेमाचा पुन्हा मांडला !!२!!


ओढुनी जवळ अशी मिठीत

देह देहात एकरूप विसावला

फिरता हात केसात अलगद

लाजून मोगरा तो दरवळला !!३!!


मांडला हा खेळ प्रणयाचा

श्वास श्वासात असा गुंतला

चिंब झाले तन  बिलगुणी

मधुचंद्राचा डाव तो रंगला!!४!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance