STORYMIRROR

Ramesh a Chavan

Others

3  

Ramesh a Chavan

Others

निसर्ग

निसर्ग

1 min
141

फिरता असा तुझ्या कुशीत

पुन्हा क्षण आनंदाने बहरले

लाभला निसर्गाचा सहवास

जणू अंग जोमाने शहारले!!१!!


झुडपात ही कुजबुज चाले

करी किलबिल पक्ष्यांचा थवा

मंजुळ स्वर छेडी ताल सुरात

फुलांनी बहरला हा पारवा!!२!!


वाट अशी ती जुनीच नव्याने

पुन्हा चाले वळण वळणात

सांडूनिया आपली जुनी पाने

नव्याने पालवी फुटे जोमात!!३!!


किरण सूर्याचे फांदी अडुनी

घेती वेध नकळत धरणीचा

उमळुनी हे काळीतून फुल

गगणी गंध उधले फुलाचा!!४!!


मंद झुळूक वाऱ्याची वाहुनी

उधळते जानी निसर्ग तराणे

स्वतःच्या मस्त गुंतून धुंदीत

निसर्ग गातो आनंद गाणे!!५!!


Rate this content
Log in