जगाचा पोशिंदा
जगाचा पोशिंदा
तळपत्या उन्हात झिजवतो काया
म्हणून मिळते दोन वेळचे खाया
राबता उन्हात पुसतो माथ्याचे घाम
वृक्षवल्ली धरते मायेची साया!!१!!
सर्ज्या राज्याच्या जोडीने फिरता
दिन भर कष्ट करूनी झुकतो खांदा
ऊन पावसाळा झेलून राबतो
तरीही उपाशी राहतो जगाचा पोशिंदा!!२!!
तुटता आभाळाची अशी माया
जाते वाया उगवलेले मातीतील सोने
नाही रडला नाही झुकला ना थांबला
कोसळून सुद्धा उभा राही जोमाने!!३!!
गेली मेहनत वाया नको डगमगू
नको कंटाळून घेऊ तू फाशी
तूच आहेस सर्वश्रेष्ठ बळीराजा
तुझ्या नासण्याने जग राहील रे उपाशी!!४!!
